ठळक बातम्या

अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, यांचा अंतर्भाव करावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.०२ :- मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव बृहन्मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना केल्या आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण औद्योगिक क्षेत्रे जानेवारी महिन्यात प्रदूषणग्रस्त

मुंबईतील प्रदुषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत.

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीही विशेष तरतूद नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा

मुंबईतील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डाटा तयार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महानगराच्या सुशोभीकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देतानात महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *