गुन्हे-वृत

तालिबानशी संबंधित व्यक्ती मुंबईवर हल्ला करणार असल्याचा ई मेल प्राप्त

मुंबई दि.०३ :- मुंबईवर तालिबानशी संबंधित व्यक्ती हल्ला करणार असल्याचा ई-मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) प्राप्त झाला असून या हल्ल्याची माहिती मुंबई पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाला देण्यात आली आहे. एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिसांना ई-मेल पाठवून याबाबतची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण औद्योगिक क्षेत्रे जानेवारी महिन्यात प्रदूषणग्रस्त

ई-मेलमध्ये ‘सीआयए’चा अधिकारी असल्याचे भासविण्यात आले आहे. याआधी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला होता.

अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, यांचा अंतर्भाव करावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सांताक्रुझ येथील एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे. या ई – मेलमध्ये अफगाणीस्थानचे नेते सिराजुद्दीन हक्कानीच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकन यंत्रणा सीआयएकडून संदेश आल्याचे भासवण्यात आले आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *