मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण औद्योगिक क्षेत्रे जानेवारी महिन्यात प्रदूषणग्रस्त
मुंबई दि.०१ :- मुंबईतील वाढत्या प्रदूषणाविषयी एक अहवाल सादर करण्यात आला असून या अहवालानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण ही चारही औद्योगिक क्षेत्रे जानेवारी महिना प्रदूषणग्रस्त ठरली. ग्रीन प्लॅनेट सोसायटीने हा अहवाल सादर केला आहे.
‘मौखिक आरोग्यासाठी ‘फिंगर बाऊल’ मध्येहात धुण्याची पद्धत बंद करावी- राज्यपाल कोश्यारी
मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. यासाठी मुंबईतील वाढते हवा प्रदूषण कारणीभूत ठरले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीही विशेष तरतूद नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा
मुंबईतील वाढत्या प्रदूषणास धूलीकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामे, ज्वलन कचरा तसेच मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाऱ्याची संथ गती आणि हिवाळ्यातील कमी तापमान हे ही कारणीभूत आहे.