महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची डोंबिवली जीमखाना येथे बैठक
डोंबिवली दि.२४ :- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडुंचा ठसा उमटावा, त्यांना योग्य दिशा देण्यासाठी वेळीच योग्य मार्गदर्शन व्हावे. यासाठी राज्यातील क्रीडा क्षेत्राची दिशा ठरविण्यासाठी येत्या गुरुवारी (२६ जानेवारी) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बैठक डोंबिवली जीमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळविण्याची अनेक खेळाडुंची क्षमता असते.
आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे- राज्यपाल कोश्यारी याची पंतप्रधान मोदी यांना विनंती
काही अडचणींमुळे अनेक खेळाडु तेथेपर्यंत पोहचत नाहीत. या सगळ्या अडचणींची विचार करुन त्याविषयी निर्णय घेणे. शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधणे, खेळ आणि खेळाडुंचा विकास करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणे या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.