‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित – निर्माते राजकुमार संतोषी यांची सुरक्षा पुरविण्याची मागणी
मुंबई दि.२४ :- राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला काही जणांकडून विरोध करण्यात येत असून संतोषी यांनी बृहन्मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची डोंबिवली जीमखाना येथे बैठक
सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान वाद-विवाद होत आहेत. काही ठिकाणी चित्रपटाविरोधात निदर्शनेही करण्यात आली. ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान झालेल्या निदर्शनानंतर आपल्याला अनेकवेळा धमक्या दिल्या गेल्या.
चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यासाठी सांगितले जात आहे. मला असुरक्षित वाटत असून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे संतोषी यांनी या पत्रात म्हटले आहे.