ठळक बातम्या

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती पाद्र्यांना अंनिसवाल्यांचा विरोध का नाही ? – महंत सुधीरदास महाराज

मुंबई दि.२३ :- चमत्कारांच्या नावे उघडपणे फसवणूक करून हिंदूंचे धर्मांतर करणा-या ख्रिस्ती मिशनरी किंवा पाद्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध का नाही? असा सवाल नाशिक येथील श्रीकाळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज यांनी उपस्थित केला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बागेश्वर धाम (पंडित धीरेंद्र शास्त्री) यांना का लक्ष्य केले जात आहे ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे कार्य करत आहेत.

आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे- राज्यपाल कोश्यारी याची पंतप्रधान मोदी यांना विनंती

त्यामुळे एका षड्यंत्राद्वारे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. फक्त पंडित धीरेंद्र शास्त्रीच नव्हे, तर हिंदु धर्म आणि हिंदु धर्मातील साधुसंत यांना बदनाम करण्याचे फार मोठे षड्यंत्र राष्ट्रीय स्तरावर राबवले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव, साम्यवादी आणि काँग्रेसचे काही लोक त्यांना कधीही आव्हान देताना दिसत नाहीत.

अंदमान-निकोबारवरील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्या सैनिकांची नावे

त्यामुळे हिंदु धर्माला अपकीर्त करणार्‍यांना रोखण्यासाठी केंद्रशासनाने कठोर कायदा करावा, अशी मागणीही महंत सुधीरदास महाराज यांनी केली. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांनी बाटवलेल्या हिंदूंची घरवापसी करण्यास प्रारंभ केल्यापासून ‘अंनिस’ने पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्याला विरोध करण्यास प्रारंभ केला आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले.
‘सुदर्शन न्यूज’च्या नागपूर येथील पत्रकार सौ. स्नेहल जोशी यांनही मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *