महापालिकेच्या २०० अधिकारी- कर्मचाऱ्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू
मुंबई दि.२४ :- बृहन्मुंबई महापालिकचे २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचाराच्या १४२ प्रकरणांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. ‘द यंग व्हिसल ब्लोअर्स फाऊंडेशन”चे जितेंद्र घाडगे यांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक बाचाबाची
या १४२ पैकी १०५ प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, ३७ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करणे बाकी आहे, अशी माहिती महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिली आहे.
३७७ प्रकरणांमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी महापालिकेने मंजुरी दिलेली नाही. मात्र १०५ प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असेही महापालिकेने लेखी उत्तरात कळविले आहे.