येत्या १ एप्रिलपासून राज्यात ई-ऑफिस कार्यपद्धती
मुंबई दि.२४ :- राज्यात येत्या १एप्रिल २०२३ पासून ई-ऑफिस कार्यपद्धती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महापालिकेच्या २०० अधिकारी- कर्मचाऱ्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू
केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, मुंबईत आयोजित ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे उदघाटन सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रणालीमुळे कामकाजाची गती वाढेल तसेच पारदर्शकता येईल, असेही ते म्हणाले.