केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक बाचाबाची

मुंबई दि.२४ :- विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बाळासाहेब ठाकरे तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित – निर्माते राजकुमार संतोषी यांची सुरक्षा पुरविण्याची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या या कार्यक्रमालास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि मंत्री तसेच परदेशी पाहुणे देखील यावेळी उपस्थित होते. राणे यांनी भाषणादरम्यान औचित्यभंग केल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला, तर राणे यांनी हुज्जत घालत आपले भाषण सुरूच ठेवले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची डोंबिवली जीमखाना येथे बैठक

नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक होत राणे यांचे भाषण बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणे यांनी न ऐकता आपले भाषण सुरूच ठेवले. राणेंनी ‘मी नाही थांबणार’ असे म्हणत “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो”, असा टोलाही गोऱ्हे यांना लगावला. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेकर यांच्या दिशेने पाहत, ‘हे काय चाललंय?म्हणत नापंसती दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published.