बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील स्थापत्य काम ६५ टक्के पूर्ण
मुंबई दि.२४ :- बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील स्थापत्य काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक हे जुन्या महापौर बंगल्याचा वारसा आणि पावित्र्य जतन करून त्यामध्ये नवीन संग्रहालय उभारले जात आहे.
येत्या १ एप्रिलपासून राज्यात ई-ऑफिस कार्यपद्धती
या स्मारकामध्ये टप्पा-१ अंतर्गत प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत, कुंड इमारतीचे बांधकाम करणे व महापौर निवासस्थान इमारतीचा सांस्कृतिक ठेवा जतन करुन या इमारतीचे संग्रहालयामध्ये रुपांतरीत करणे, तसेच सभोवतालच्या परीसराचे सुशोभिकरण करणे आदि कामांचा समावेश आहे.