आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे- राज्यपाल कोश्यारी याची पंतप्रधान मोदी यांना विनंती
मुंबई दि.२३ :- राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतित करु इच्छितो, अशी इच्छा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत दिली.
अंदमान-निकोबारवरील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्या सैनिकांची नावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडेच झालेल्या मुंबई भेटीत आपण त्यांच्याकडे ही इच्छा व्यक्त केली, अशी माहिती राजभवनने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात राज्यपाल कोश्यारी यांनी दिली आहे.
सैनिकांना मानवंदना देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली दौड
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.