‘आयएनएस वजीर’ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल
मुंबई दि.२३ :- नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नौदल तळावर झालेल्या एका शानदार कार्यक्रमात ‘आयएनएस वजीर’ ही पाणबुडी सोमवारी नौदलाच्या सेवेत दाखल झाली. या पाणबुडीमुळे समुद्रात गस्त घालण्याच्या नौदला क्षमतेत वाढ होणार आहे.
नेहरू सेंटरमध्ये ‘व्हॅली ॲंड फ्लॉवर्स’ प्रदर्शन
मुंबईत माझगाव डॉकयार्ड कलवरी मार्गातील पाणबुड्यांची निर्मिती करत आहे. डॉकयार्डने बांधलेल्या कलवरी, खंदेरी, करंज आणि वेला अशा चार पाणबुड्या नौदलात याआधी दाखल झाल्या होत्या. आता यामध्ये ‘आयएनएस वजीर’ च्या रुपाने पाचव्या पाणबुडीची भर पडली आहे.
कोकण रेल्वेवर आणखी चार लांब पल्ल्यांच्या गाड्या विद्युत इंजिनावर धावणार
सहावी आणि कलवरी वर्गातील शेवटची पाणबुडी वगशीर INS Vagsheer पाणबुडीच्या समुद्रातील चाचण्या सुरु असून एप्रिल २०२४ मध्ये अखेरपर्यंत ही पाणबुडी नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे आहे.