अंदमान-निकोबारवरील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्या सैनिकांची नावे
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२३ :- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने अंदमान-निकोबार बेटावरील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
सैनिकांना मानवंदना देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली दौड
अंदमान-निकोबारवरील २१ बेटांचे नामकरणही पंतप्रधान मोदींनी केले. या २१ बेटांना आता परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखले जाणार आहे.
देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी ‘उबाठा’ शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती- उद्धव ठाकरे
अंदमानच्या भूमीवर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला. येथे स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झालं. वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज २१ बेटांना परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांची नावे देण्यात आली आहेत, असेही मोदी म्हणाले.