व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक
शेखर जोशी
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर ग्रंथसखा प्रकाशनाने ‘व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक’ प्रकाशित केला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले, व्यंकटेश माडगूळकर यांनी अन्य काहीजणांविषयी लिहिलेले आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेख असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. माडगूळकर यांनी लिहिलेली पहिली कथा जुलै १९४६ मध्ये ‘अभिरुची’त प्रसिद्ध झाली होती. ती संपूर्ण कथा या ग्रंथात देण्यात आली आहे.
माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत अपघातात जखमी
या कथेचे नाव ‘काळ्या तोंडाची’ असे होते. माडगूळकर यांनी लिहिलेल्या ‘बनगरवाडी’चा बहुतांश भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी, जर्मन आदि भाषांमध्ये अनुवाद झाला. ‘माणदेशी माणसे’ आणि ‘बनगरवाडी’ने माडगूळकर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. स्वतः माडगूळकर यांनी ‘बनगरवाडी’ विषयी लिहिलेले दोन लेख तर प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर आणि दिगंबर पाध्ये यांनी लिहिलेले लेख ग्रंथात आहेत. ‘कथा वाड्मयातील उच्चांक’ अशा शब्दात शेजवलकर यांनी ‘बनगरवाडी’विषयी लिहिले आहे.
वेणुगोपाल धूत यांची जामिनावर सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश
माडगूळकर यांनी वडिलांविषयी लिहिलेला ‘दादा’, साहित्यिक पु.भा. भावे यांच्यावर लिहिलेला ‘एक स्पार्टन योद्धा’ तसेच माडगूळकर यांनी लिहिलेले सुरुवातीचे दिवस, माझ्या लिखाणामागील कळसूत्रे आणि अंबाजोगाई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून केलेले संपूर्ण भाषणही वाचायला मिळते. यासह रवींद्र पिंगे, व.दि. कुलकर्णी, रविमुकुल, गंगाधर गाडगीळ यांनी माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेखही आहेत.
वेगवेगळ्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे लेख व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांकात घेण्यात आले आहेत. माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेले हे सर्व लेख या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतात. मराठी साहित्याचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि माडगूळकर साहित्यप्रेमी यांच्यासाठी हा विशेषांक एक संदर्भ ग्रंथ ठरला आहे. कॅ. आशिष दामले या विशेषांकाचे संपादक असून श्याम जोशी हे कार्यकारी संपादक आहेत.