टिळकनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साजरे
डोंबिवली दि.१३ :- टिळकनगर विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणाचे ‘आवर्तन – ३’ संमेलन रविवारी आयोजिन करण्यात आले होते. संमेलनास १३०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी आणि सी.ए. असलेले संजय पानसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी ‘शिक्षण क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हाने’ याबद्दल विचार मांडले.
टिळकनगर बालक मंदिर शाळेचा ‘भाजी मंडई’ उपक्रम
निलेश निरगुडकर ,अबोली ठोसर, सुहास बांदिवडेकर , सुबोध जोशी यांनी गाणी सादर केली तर डॉ. प्रसाद खांडेकर, चित्रलेखा वैद्य, केदार फडके या विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी आपली ‘यशोगाथा’ उलगडून सांगितली. एकत्र येऊन समाजकार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. निवृत्त शिक्षक आणि कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.