मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघातात गेल्या वर्षी अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू
मुंबई दि.१२ :- मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघात आणि अन्य घटनांमध्ये गेल्या वर्षी २ हजार ५०७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गाडीतून पडल्याने ७०० प्रवाशांनी प्राण गमावला. उर्वरित मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना किंवा गाडीतून प्रवास करताना खांबाला आदळल्याने झाले आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ देण्यासाठी तर्पण फाऊंडेशनसमवेत करार
सर्वात जास्त मृत्यू मध्य रेल्वेवरील कल्याण आणि ठाणे येथे झाले असून ही संख्या अनुक्रमे १०५ आणि ८९ अशी आहे. रुळ ओलांडताना ठाणे रेल्वे स्थानकात १२७ तर कुर्ला रेल्वे स्थानकात १०१ जणांना प्राण गमवावे लागले. पश्चिम रेल्वेवर रुळ ओलांडताना बोरीवली रेल्वे स्थानकात १४० तर वसई रेल्वे स्थानकात ११३ जणांचा मृत्यू झाला.