बॉलिवूडवाले माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुस्लिमधार्जिण्या चित्रपटांवर बहिष्कार सुरू ठेवा – तान्या, संपादिका, संगम टॉक्स
मुंबई दि.११ :- बॉलिवूडवाले माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुस्लिमधार्जिण्या चित्रपटांवर बहिष्कार सुरू ठेवावा, असे आवाहन ‘संगम टॉक्स’ च्या संपादिका तान्या यांनी केले. गेली काही वर्षे इस्लामला महत्त्व देणारे आणि हिंदु धर्मविरोधी चित्रपट बनवले जात आहेत. नायक मुसलमान धार्जिणा, तर खलनायक हिंदूंना दाखवले जाते. चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ देण्यासाठी तर्पण फाऊंडेशनसमवेत करार
अशा वेळी सुनील शेट्टीसारख्या हिंदू अभिनेत्याला पुढे करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण अजूनही बॉलीवूडवाले माफी मागायला तयार नाहीत. यात मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ आहे. बॉलीवूडने त्यांना पैसे पुरवणारी जी टोळी आहे, त्यांना आपले मायबाप मानले आहे. प्रत्यक्षात प्रेक्षक मायबाप आहेत, हे ते विसरले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
बॉलीवूडचे चित्रपट आणि वेबसिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्य आहेत, असे तसेच हिंदु धर्मातील पंडित, संस्कार, रीती या जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्यांचे धर्मगुरु हे उदात्त विचारसरणीचे आहेत, असेही दाखवले जाते.
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक
तसेच हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे, आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करू शकतात, स्वातंत्र्य देऊ शकतात, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे, जे हिंदु मुलींना समजत नाही. त्यामुळे त्या ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकतात, असे स्तंभलेखिका, संशोधक रती हेगडे यांनी सांगितले.
मेट्रो २ अ मार्गिकेमधील ‘पहाडी गोरेगाव’, ‘लोअर मालाड स्थानकांचे नाव बदलण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
तर केवळ चित्रपटच नव्हे, तर ज्या जाहिराती दाखवल्या जातात, त्यातून अनेक हिंदु प्रथा-परंपरावर आघात केले जातात, तसेच जुन्या परंपरांविषयी न्यूनगंड निर्माण करून त्या बदलण्याची वेळ आली आहे, असा संदेश दिला जातो. सुनील शेट्टी ‘सर्व बॉलिवूडवाले वाईट नाहीत’, असे म्हणतात; पण ज्या वेळी ‘लव्ह जिहाद’ला खतपाणी घालणारे चित्रपट किंवा जाहिराती आल्या, त्याविरुद्ध त्यांनी आवाज का उठवला नाही? असा सवाल हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक आनंद जाखोटिया यांनी केला.