डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री दोन दिवस सहभागी होणार
मुंबई दि १२ :- स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत.
मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
१६ आणि १७ जानेवारी असे दोन दिवस मुख्यमंत्री या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत, अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
शाळा उडवून देण्याची धमकी देणा-या वक्तीला अटक
जवळपास २० उद्योगांसमवेत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे करार होणार आहेत. याशिवाय पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.