भूमिहीन लाभार्थींना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन
मुंबई दि.१० :- राज्यात पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) मधील कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीमध्ये ९४ हजार २५१ आणि आवास प्लसमध्ये ४१ हजार १९१ असे एकूण १ लाख ३५ हजार ४४२ भूमिहीन लाभार्थी आहेत. आतापर्यंत ६६ हजार भूमिहीन लाभार्थींना विविध योजनांतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ६९ हजार ४४२ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
मुंबईत २०० इ बस सुरू करण्याचा ‘बेस्ट’ निर्णय
भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करुन देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कोणताही भूमिहीन लाभार्थी गृहनिर्माण योजनांपासून वंचित राहू नये याकरिता राज्य शासनाने विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.
यावर्षी मकर संक्रांत १५ जानेवारीला- पंचांगकर्ते दा.कृ. सोमण
यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना ५०० चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यासाठी रक्कम ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य पुरविण्यात येत असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ३ हजार ३०८ लाभार्थींना, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे या योजनेंतर्गत २३ हजार ५३० लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे, असेही महाजन यांनी सांगितले. निवासी जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे या योजनेंतर्गत १२ हजार १४३ लाभार्थींना तर बक्षिसपत्र, भाडेपट्टा आदींद्वारे २७ हजार लाभार्थींना लाभ देण्यात आला असल्याचही महाजन म्हणाले.