वाहतूक दळणवळण

मुंबईत २०० इ बस सुरू करण्याचा ‘बेस्ट’ निर्णय

मुंबई दि.१० :- मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्गांवर लवकरच २०० ई-बस सुरू करण्याचा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे. येत्या १४ जानेवारी २०२३ रोजी किमान १० डबलडेकर ई-बस मुंबईत आणल्या जाणार आहेत. परिवहन प्राधिकरणाने पुढील वर्षी जूनपर्यंत ५०० इलेक्ट्रिक वाहनांसह बेस्ट टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे आणि त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

यावर्षी मकर संक्रांत १५ जानेवारीला- पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

मुंबईत लवकरच वांद्रे कुर्ला संकुल ते नवी मुंबईतील खारघर या मार्गावर बेस्टची प्रिमियम बससेवा सुरू होणार आहे. चेंबूर ते कफ परेड, ठाणे ते पवई या दोन मार्गांवर सुद्धा बेस्टच्या प्रिमियम बसेस सुरू होणार आहेत. प्रवाशांना या बसमधून प्रवास करताना चलो अ‍ॅपच्या माध्यमातून आपली जागा आरक्षित करावी लागणार आहे.

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासूनच जलसंधारणाची नवी कामे द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या बस संपूर्णरित्या डिजिटल असणार आहेत. बसेसमधील सेवा पूर्णपणे डिजिटल असल्याने, या प्रिमियम बसेसमध्ये बस कंडक्टर नसतील आणि प्रवासी टॅप-इन टॅप-आउट सुविधा वापरू शकतील यासाठी प्रवाशांना चलो कार्डाचा वापर करावा लागेल, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *