ठळक बातम्या

यावर्षी मकर संक्रांत १५ जानेवारीला- पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

ठाणे दि.१० :- यावर्षी शनिवार १४ जानेवारी रोजी रात्री ८-४४ वाजता  सूर्य  निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांत रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. निरयन मकर संक्रांती दरवर्षी  १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो.

देश एकसंध ठेवण्यात केरळचे मोठे योगदान- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात असतो. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे.

‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात अक्षय केळकर विजेता

सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती  चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे, असेही सोमण यांनी सांगितले. २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांती १५ जानेवारीला तर सन २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार असल्याचेही सोमण म्हणाले. मकर संक्रांतीचा सण हा अशुभ नाही. मकर संक्रांतीच्यावेळी अनेक खोट्या व चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. मकर संक्रांती कोणालाही वाईट नसते असेही सोमण यांनी स्पष्टपणे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *