मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.०७ :- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकप्रमाणे उद्या (रविवारी) मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग २ अ (दहिसर पश्चिम ते अंधेरी पश्चिम डीएन नगर) आणि ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) वर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे.
भिवंडी येथे तीन बोगस डॉक्टरांना अटक
हे दोन्ही मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरु करायचे आहेत त्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सार्वजनिक घोषणा प्रणाली, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक आदींच्या चाचण्या व संबंधित कामे केली जाणार आहेत.