भिवंडी येथे तीन बोगस डॉक्टरांना अटक
भिवंडी दि.०७ :- भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भिवंडी शहर पोलिसांनी तीन बोगस डाॅक्टरांना अटक केली आहे. लक्ष्मीनारायण इगा (४६), नरेश बाळकृष्णा (४९) आणि साहबलाल वर्मा (५२) अशी अटकेत असलेल्या बोगस डाॅक्टरांची नावे आहेत.
व्यापार, उद्योग जगताकडून उत्तर प्रदेशात ५ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार
यांचे शिक्षण जेमतेम दहावी, बारावीपर्यंत झाले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये वाॅर्डबाॅय म्हणून काम केल्यानंतर त्यांनी परिसरात दवाखाने सुरू केल्यची माहिती प्राथमिक समोर आली आहे. बोगस डाॅक्टर दाम्पत्यांनी केलेल्या उपचारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.