बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्या बालचित्रकला स्पर्धा
मुंबई दि.०७ :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे उद्या ( ८ जानेवारी) बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध ४५ ठिकाणी सकाळी ८ ते ११ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला आदेश
विजेत्या बाल चित्रकारांना ५०० ते २५ हजार रुपयांपर्यंत ५५२ बक्षिसे देण्यात येणार आहेत. अशी माहिती शिक्षण खात्याचे उपायुक्त केशव उबाळे यांनी दिली. स्पर्धेचे यंदा १४ वे वर्ष असून स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात येणार आहे. इयत्ता पहिली व दुसरी, इयत्ता तिसरी ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते दहावी असे गट आहेत.
भिवंडी येथे तीन बोगस डॉक्टरांना अटक
अधिक माहितीसाठी ७७७७-०२५-५७५ या क्रमांकावर किंवा www.balchitrakala.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.