पुढील दोन दिवस मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर
प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावली
मुंबई दि.०७ :- गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्यामुळे शहरातील प्रदूषणातही वाढ झाली आहे. प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावल्याने पुढील दोन दिवस मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर राहण्याचा अंदाज आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्या बालचित्रकला स्पर्धा
मुंबईतील कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबुर, मालाड, नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता अतिधोकादायक, तर भांडुप परिसरातील हवा धोकादायक पातळीवर असू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला आदेश
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेअंतर्गत असलेल्या ‘सफर’ प्रणालीकडून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि हवेच्या गुणवत्तेचा अंदाज दिला जातो. त्यानुसार हवेच्या गुणवत्तेचे चांगली, समाधानकारक, सामान्य, धोकादायक, अतिधोकायदायक असे निकष निश्चित करण्यात येतात. या निकषांनुसार मुंबईची हवा बिघडल्याचे समोर आले आहे.