व्यापार, उद्योग जगताकडून उत्तर प्रदेशात ५ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार
मुंबई दि.०६ :- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दोन दिवसांचा मुंबई दौरा उत्तर प्रदेशासाठी लाभदायक ठरला आहे. या दौऱ्याचे फलित म्हणजे उद्योग, व्यापार, वाहतूक क्षेत्रात उत्तर प्रदेशात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
बोरीवली ते ठाणे अवघ्या वीस मिनिटांत
उत्तर प्रदेशात होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेसाठी उद्योगपतींना निमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले होते. या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईतील बँकर्स, आघाडीचे उद्योगपती, अभिनेते आणि निर्मात्यांसोबत चर्चा केली. रिलायन्स समूहाने राज्यभरात ५ जी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचा आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.
अदानी समूहाने एनसीआरमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालय आणि नोएडामध्ये १० हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असे उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून सांगण्यात आले.