खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई दि.०६ :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने ही सुनावणी घेतली.
व्यापार, उद्योग जगताकडून उत्तर प्रदेशात ५ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार
येत्या २४ जानेवारीला या प्रकरणी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. शिवडी न्यायदंडाधिका-यांच्या न्यायालयासमोर खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’तील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं संजय राऊतांविरोधात बाजवलेलं अजामीनपात्र वॉरंट राऊतांनी तातडीनं दुपारीच कोक्टापुढे हजेरी लावत रद्द करून घेतलं आहे. अब्रुनुकसानीच्या दाव्यावरील सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्यानं अखेर न्यायालयानं तक्रारदाराच्या विनंतीवरून ही कारवाई केली होती.