गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील ५५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
मुंबई दि.०४ :- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा ‘गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता’ अर्थात ‘गोरेगांव – मुलुंड लिंक रोड’ प्रकल्पात अडथळा ठरणारी ५५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत ‘एस विभाग’ कार्यक्षेत्रातील सुदर्शन हॉटेल ते तुळशेतपाडा या सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या भागातील ५५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
महापालिका प्रशासनाच्या ‘एस’ विभागाकडून करण्यात आलेल्य कारवाईनंतर मोकळ्या केलेल्या सदर भागाचा ताबा बृहन्मुंबई महापालिकेच्या पूल खात्याकडे देण्यात आला,अशी माहिती ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली.