सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिका सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार
मुंबई दि.०३ :- मोठे नाले, उपनाले, पर्जन्य जलवाहिन्या यातून वाहणारे सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांसाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती सल्लागाराची निवड करण्यात आली असून या कामासाठी सल्लागाराला पावणेदोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात ‘माहीम निसर्ग उद्यानाचा’ समावेश केला जाणार नाही
मुंबई शहर आणि उपनगरात एकूण २९ मोठे नाले असून हे नाले, उपनाले, खाड्या तसेच पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणीही समुद्राला जाऊन मिळते. पावसाळा संपल्यानंतरही नाले, पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी समुद्राला जाऊन मिळते. यावर उपाययोजना करण्याविषयी महाराष्ट्र प्रदूुषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला सूचना आणि दंडही केला होता. त्यामुळे महापालिकेने उपरोक्त निर्णय घेतला आहे.