सावरकर स्मारक आणि खगोलमंडळ यांच्या विद्यमाने ‘दुर्बिणीतून आकाश निरीक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई दि.०२ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि खगोल मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या शिवाजी उद्यान येथील सावरकर स्मारकाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ‘दुर्बिणीतून आकाशनिरीक्षण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनि ग्रहाची वलये, गुरुग्रहाचे चार प्रमुख चंद्र, चंद्रावर दिसणारी विवरे आणि अन्य ग्रहांचे उपस्थितांना दुर्बिणीतून निरीक्षण घडविण्यात आले.
वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापरल्याने दोन हजार अपघात, एक हजार चाळीस जणांचा मृत्यू
आकाशातील काही निवडक तारकासमूह तसेच ध्रुव तारा ओळखण्याची पद्धत यांची माहितीही यावेळी देण्यात आली. खगोलशास्त्राशी संबंधित उपस्थितांनी विचारलेल्या अनेक शंका, प्रश्न यांचे समाधान खगोल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.
मराठी भाषा विभागाचे ‘मराठी तितुका मेळवावा’ संमेलन – ४ ते ६ जानेवारी दरम्यान आयोजन
या कार्यक्रमास सुमारे पाचशे बहुभाषिक नागरिक उपस्थित होते. खगोलशास्त्राचा प्रचार, प्रसार तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, यासाठी अशा प्रकारचे अनेक उपक्रम खगोल मंडळ तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने यापुढेही आयोजित केले जातील, असे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.