वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापरल्याने दोन हजार अपघात, एक हजार चाळीस जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.०२ :- वाहन चालवताना भ्रमणध्वनी वापरल्यामुळे २०२१ या वर्षांमध्ये एकूण सुमारे दोन हजार अपघात झाले. या अपघातात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
मराठी भाषा विभागाचे ‘मराठी तितुका मेळवावा’ संमेलन – ४ ते ६ जानेवारी दरम्यान आयोजन
लाल सिग्नल ओलांडल्यामुळे २०२१ या वर्षात ५५५ रस्ते अपघात झाले. या अपघातात २२२ लोकांना आपला जीव गमवावा लागला. २०२१ या वर्षात खड्ड्यांमुळे ३ हजार ६२५ अपघात झाले. यात १ हजार ४८१ लोकांचा मृत्यू झाला.