ठळक बातम्या

मुंबईची हवा खराब तीन हवा तपासणी केंद्रे लवकरच सुरू होणार

मुंबई दि.३१ :- मुंबईत चौदा ठिकाणी हवा तपासणी केंद्रे उभारण्यात आली असून त्यापैकी तीन तपासणी केंद्रे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० च्या पार गेला आहे.

मालाडमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३१६ तर माझगावचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचला आहे. वांद्रे कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे ३०७, ३१९, ३३९ वर पोहोचला आहे.

या परिस्थितीमुळे मुंबईकरांना सध्या खोकल्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मुखपट्टीचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.‌

नववर्षाचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने झाले तर हवा गुणवत्ता पातळी आणखी खालविण्याची शक्यता आहे. मुंबईत सुरु असलेली बांधकामे, मुंबईच्या समुद्राजवळील मोठी जहाजे, वाहतूक कोंडी, उडणारी धुळ यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *