माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबई दि.३१ :- मध्य रेल्वेवर उद्या (१ जानेवारी) माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ अशी मेगा ब्लॉकची वेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेसाठीची दुसरी मेट्रो गाडी मुंबईत दाखल
ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
चर्चगेट-डहाणू रोड आणि डहाणू रोड-विरार लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल
हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.