टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विद्यार्थ्यांची चित्रे, निबंध यांचा समावेश
डोंबिवली दि.३१ :- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या २०२३ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी होते. मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्र कमतेकर हे ही व्यासपीठावर उपस्थित होते. दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे असून मागच्या बाजूला ‘पर्यावरण रक्षण’ या विषयावर विद्यार्थ्यांनी लिहिलेले निबंध देण्यात आले आहेत. शाळेच्या माजी प्रथितयश विद्यार्थ्यांच्या मुलाखती शाळेच्याच काही विद्यार्थ्यांनी घेतल्या होत्या.
माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक
त्यांचे संकलन आणि ‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा”च्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे शिक्षकांचे लेखही या दिनदर्शिकेत आहेत. दिनदर्शिकेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दरवर्षी खूप मोठी रचना उभी केली जाते. मंडळाच्या कार्यकारिणीतील सदस्यांबरोबरच त्या त्या विभागाचे मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी यांची मोठा संच कार्यरत असतो. सर्व विभागातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेऊन त्यातून विविध वयोगटातील विद्यार्थ्यांची १२ चित्रे निवडली जातात.
मुंबईची हवा खराब तीन हवा तपासणी केंद्रे लवकरच सुरू होणार
तसेच दरवर्षी काही मध्यवर्ती विषय निश्चित करून विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली जाते व विविध वयोगटानुसार त्यातील १२ निबंध निवडले जातात. शिक्षकांसाठी ही विषय ठरवून लेख मागवले जातात. सुमारे दोन महिने आधीपासून याची तयारी सुरू असते. ही दिनदर्शिका शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक – कर्मचारी सभासद, देणगीदार, समाजातील मान्यवर व्यक्ती, संस्था यांना मोफत वितरित करण्यात येते. दिनदर्शिकेच्या छपाईचा संपूर्ण खर्च टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे केला जातो.