सीमाप्रश्नाचा ठराव मंजूर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील कॉंग्रेसच्या उल्लेखाने विरोधकांचा गदारोळ
नागपूर दि.२७ :- कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भातील ठराव एकमताने विधानसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला. ठरावावरील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसचा उल्लेख केल्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठराव वाचून दाखवल्यानंतर एकमताने तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.
कर्ज घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना अटक
मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना त्यांनी काँग्रेसचा उल्लेख करुन राजकीय टीका करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. ठराव मांडण्याआधीच या ठरावर चर्चा व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली असता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठरावावर चर्चा न करता तो एकमताने संमत करावा. चर्चा झाल्यास राजकीय आरोप प्रत्यारोप होतील असं फडणवीस म्हणाले होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ठराव वाचून दाखवला. त्यानंतर तो सभागृह अध्यक्षांनी वाचला आणि संमत झाला.
राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी कृतिशील होण्याचा हिंदूंचा निर्धार
ठराव संमत झाल्यानंतर शिंदेंनी आभार मांडतानाच काँग्रेसचा उल्लेख केल्याने गदारोळ सुरु केला. यावेळेस अध्यक्ष नार्वेकर विरोधकांना मुख्यमंत्री आभार व्यक्त करत असल्याचे सांगितले. काही वेळापूर्वी फडणवीसांनी राजकीय आरोप प्रत्यारोप नको असे म्हटले असतानाही शिंदेंनी काँग्रेसचा उल्लेख केल्याने विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवला.
कोरोना नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महापालिका सज्ज
अजित पवार यांना तुम्ही जागेवर बसा असे सांगत अध्यक्ष नार्वेकर विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर शिंदेंनी, मी टीका करत नाहीये, असे सांगितले. तरीही काँग्रेसचा उल्लेख केल्याने विरोधकांचा गदारोळ सुरु होता. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करुन विरोधकांना शांत केले. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भाषण सुरु केले. तरीही काही वेळ गदारोळ सुरुच राहिला अखेर विरोधकांनाही बोलण्याची संधी मिळेल असे अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितल्यानंतर विरोधक शांत झाले.