ठळक बातम्या

राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी कृतिशील होण्याचा हिंदूंचा निर्धार

ठाणे दि.२६ :- लँड जिहाद, हलाल जिहाद, लव्ह जिहादद्वारे भारताला २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण सर्वांनी संघटितपणे हे प्रयत्न करून हाणून पाडायचे आहेत, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे प्रसाद वडके यांनी केले.

हिंदू जनजागृती समितीतर्फे ठाणे येथील श्री आई माताजी मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या हिंदू राष्ट्र जागृती सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. १९७६ मध्ये आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींच्या कार्यकाळात राज्य घटनेत दुरुस्ती करून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घुसडले गेले. आजपर्यंत राज्य घटनेत शंभरहून अधिक वेळा बदल केले. मग आता पुन्हा घटना दुरुस्ती करून हिंदू राष्ट्र का बनवले जाऊ शकत नाही ? असा सवाल वडके यांनी केला.

यावेळी सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर, सिरवी विकास समाज मंडळाचे अध्यक्ष सुरेश वरपा यांनीही मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक अनुराधा वाडेकर यावेळी उपस्थित होत्या. हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक असून त्याकरता आध्यात्मिक सामर्थ्य व हिंदू संघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे, असे वाडेकर म्हणाल्या. सभेचा प्रारंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने झाला. हिंदू जनजागृती समितीच्या कार्याविषयी समितीचे सुनिल कदम यांनी माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन समितीचे हेमंत पुजारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *