ठळक बातम्या

मुंबई आसपास संक्षिप्त

विशेष गोवर लसीकरण मोहीम

मुंबई – महाराष्ट्रातील गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने एकही बाळ लसीपासून वंचित राहू नये यासाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत १५ डिसेंबरपासून दोन टप्प्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख २४ हजार ४६७, तर मुंबईत सहा हजार २५७ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 सीमाप्रश्नाचा ठराव मंजूर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील कॉंग्रेसच्या उल्लेखाने विरोधकांचा गदारोळ

मनोरा’ आमदार निवासाचा पुनर्विकास एल अ‍ॅण्ड टी करणार

मुंबई – मुंबईतील ‘मनोरा’ आमदार निवासाचा चार वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास अखेर एल अ‍ॅण्ड टी समूह मार्गी लावणार आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुनर्विकासासाठी आर्थिक निविदा खुली केली. यावेळी एल अ‍ॅण्ड टी समूहाची एकमात्र निविदा सादर झाली. त्यामुळे ही निविदा अंतिम करून एल अ‍ॅण्ड टी समूहाला कंत्राट बहाल करण्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

कर्ज घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना अटक

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे सोमवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. राजा बापट यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘सागर माझा प्राण’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘यशोदा’, ‘श्रीमंत’ या नाटकांत तसेच ‘बाळा गाऊं कशी अंगाई’, ‘एकटी’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘थोरली जाऊ’, ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते. रफ्तार’, ‘दुश्मन’, ‘खोज’ या हिंदी मालिकांमध्येही छोटेखानी भूमिका केल्या होत्या.

राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी कृतिशील होण्याचा हिंदूंचा निर्धार

‘म्हाडा’च्या घरांसाठी फक्त एकदाच नोंदणी करावी लागणार

मुंबई – म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी जानेवारी २०२३च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नोंदणीला सुरूवात होणार आहे. म्हाडाच्या घरासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागतो. पण त्यासाठी नोंदणी प्रक्रिया देखील दर वेळी नव्याने करावी लागते. आता म्हाडाने ही प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यापुढे घरासाठी फक्त एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी कायमस्वरुपाची असणार आहे. याच्या आधारावर भविष्यात मंडळाच्या कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे.

कोरोना नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महापालिका सज्ज

डोंबिवली – मोठागाव ते दुर्गाडी किल्ला अंतर सहा मिनिटांत

डोंबिवली – कल्याण दुर्गाडी ते टिटवाळा या रिंगरोडच्या ४ ते ७ टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ५३१ कोटींच्या निविदा ‘एमएमआरडीए’कडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या टप्प्यात डोंबिवली पश्चिम मोठागाव ते दुर्गाडीपर्यंतच्या नदीकिनारी रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे मोठागाव ते दुर्गाडी हे १० किमीचे अंतर ६ मिनिटांत गाठता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *