पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी कडोंमपा प्रयोगशाळा उभारणार
कल्याण दि.२७ :- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी स्वत:ची जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दूषित पाणी आढळले की त्याचा नुमना घेऊन तो जल तपासणीसाठी कोकण भवन येथे पाठवावा लागतो.
सीमाप्रश्नाचा ठराव मंजूर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील कॉंग्रेसच्या उल्लेखाने विरोधकांचा गदारोळ
त्यानंतर आठवड्याने पाण्याचा अहवाल आल्यानंतर पालिका प्रशासन पुढील कार्यवाही करते. हा विलंब टाळण्यासाठी आणि दूषित पाण्याची गुणवत्ता तात्काळ समजण्यासाठी महापालिका प्रशासनाने जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. येत्या तीन ते चार महिन्यात सुसज्ज प्रयोगशाळा उभारली जाणार आहे.