ठळक बातम्या

अंधेरीतील कामगार रुग्णालय प्रशासन आणि कंत्राटदार यांची चौकशी करा – राजेश शर्मा

मुंबई दि.२३ :- अंधेरीतील कामगार रुग्णालय मागील दोन- तीन वर्षांपासून बंद आहे. रुग्णालय बंद असल्याने रुग्णांचे हाल होत असून रुग्णालय सुरू होण्याच्या दिरंगाई प्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि कंत्राटदार यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शर्मा यांनी केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेश यादव यांना शर्मा यांनी पत्र पाठवून ही मागणी केली आहे. कामगार राज्य विमा योजनेचे अंधेरीतील रुग्णालय हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल म्हणून कार्यरत होते. या प्रकरणाची दखल घेऊन रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे, असेही शर्मा यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *