ठळक बातम्या

अन्न आणि औषध प्रशासन आता मद्याचीही गुणवत्ता तपासणार

मुंबई दि.२० :- अन्न व औषध प्रशासनाकडून आता मद्याच्या गुणवत्तेचा दर्जाही तपासण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या मद्यांमध्ये अल्कोहोलचा समावेश किती असावा? याचे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मद्याच्या नमुन्यांमधील गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मद्याचा वापर केला जातो. या मद्यामध्ये शिसे, पारा, तांबे, अर्सेनिक कॅडमियम, इथिल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल या आरोग्यास घातक असलेल्या घटकांचा समावेश आहे का, याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *