मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नव्या वर्षात आणखी ३० सरकते जिने बसविणार
मुंबई दि.२० :- मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मार्च २०२३ पर्यंत अनुक्रमे २० आणि १० सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर नव्याने आणखी २० सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.
यात भायखळा, विद्याविहार, विक्रोळी, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, ठाकुर्ली, इगतपुरी, कांजूरमार्ग स्थानकात प्रत्येकी दोन आणि आंबिवली, जिटीबी नगर स्थानकात प्रत्येकी एका सरकत्या जिन्याचा समावेश आहे.
मार्च २०२३ पर्यंत चर्नी रोड स्थानकात दोन, तर सांताक्रूझ, वांद्रे स्थानक, वांद्रे टर्मिनस, विलेपार्ले, वसई रोड, सफाळे, वाणगाव, घोलवड स्थानकात प्रत्येकी एक सरकता जिना बसविण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.