मुंबईत विविध ठिकाणांहून ४ हजार ३६ किलो अमलीपदार्थ जप्त
एकूण किंमत ४ हजार ९२८ कोटी रुपये
मुंबई दि.१५ :- मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) गेल्या ११ महिन्यांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल चार हजार ९२८ कोटी रुपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ४ हजार ०३६ किलो अमलीपदार्थांमध्ये एमडीसह हेरॅाईन, चरस, गांजा, कोकेन आदींचा समावेश आहे.
गेल्या ११ महिन्यांमध्ये मुंबईत दाखल झालेल्या ७०८ गुन्ह्यांमध्ये ८४४ आरोपींंना अटक करण्यात आली. याआधी २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ०२१ कोटी रुपये किंमतीचे अमलीपदार्थ ‘एएनसी’ने जप्त केले होते. मुंबई शहरात तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण अमलीपदार्थांपैकी ९९ टक्के अमलीपदार्थ एकट्या ‘एएनसी’ने जप्त केले आहेत.