सामान्य

डेन्मार्क राज्यात दुग्ध उत्पादनातील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार

डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांचे प्रतिपादन
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि. २२ डेन्मार्क जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असून आपल्या देशाने भारताला दुग्ध क्रांती घडवून आणण्यात मदत केली आहे. डेन्मार्क भारतातील अनेक राज्यांना कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सहकार्य करीत असून लवकरच महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार असल्याची माहिती डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी मंगळवारी येथे दिली.

देशाच्या उभारणीत तरुणांच्या कौशल्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाचे प्राधान्य

फ्रेडी स्वेन यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. डेन्मार्क तामिळनाडूमध्ये विंड पार्क स्थापन करत असून भारतातील शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने देखील सहकार्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी ३३ आरोपींना ‘मोक्का’

राजदूत फ्रेडी स्वेन यांचे राज्यात स्वागत करताना डेन्मार्क आणि महाराष्ट्र सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष देऊ, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.  बैठकीला डेन्मार्कचे व्यापार व वाणिज्य प्रमुख सोरेन कँनिक मारकार्डसेन तसेच डेन्मार्कचे मुंबईतील उप-वाणिज्यदूत हेन्री करकाडा उपस्थित होते.

जाकार्ताला भूकंपाचा धक्का २० जणांचा मृत्यू, ३०० जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *