‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार तातडीने हटविण्याची मागणी
मुंबई दि.१४ :- सातारा जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रीतीसंगमाच्या मागच्या बाजूस हजरत जाफर अली बाबा या नावाने बांधण्यात आलेली अवैध मजार तातडीने हटवावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री
हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या अवैध बांधकामाला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महापालिका सेवा – सुविधांसह सज्ज
अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे म्हणजे हा एकप्रकारे ‘लँड जिहाद’च असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे. ही मजार तात्काळ हटविण्यासाठी राज्य शासनाने सूचना द्याव्यात. शासन आणि प्रशासन यांनी ठराविक कालावधीत हे अवैध बांधकाम जमीनदोस्त करावे, असेही हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.