कोंढवा येथील शाळेत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण केंद्र ही गंभीर बाब- डॉ. रिंकू वढेरा

मुंबई दि.२५ :- कोंढवा येथील शाळेत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जाणे ही गंभीर बाब इतकी वर्षे पोलीस प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही ? असा प्रश्न लेखिका आणि इतिहास तज्ञ डॉ. रिंकू वढेरा यांनी उपस्थित केला. हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘इस्लामी शाळा : मदरसा की आतंकवादी केंद्र ?’या ऑनलाईन ‘विशेष संवादा’त त्या बोलत होत्या. हिंदूंनी जागरूक नागरिक होऊन कुठेही अनधिकृत किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्वरित आवाज उठवायला हवा.

मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे वसाहतीतील १७७ झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली

हिंदूंनी स्वत:च्या मुलांना नियमित मंदिरात नेणे, लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ संस्कार करणे आवश्यक आहे. जेणेकरून एक जागरूक समाज निर्मिती होऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे विचार हिंदू समजमनावर रुजतील, असेही डॉ. वढेरा यांनी सांगितले. ‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक दत्तात्रय उभे म्हणाले, मागील ३० वर्षांत वाढलेल्या मुसलमान लोकसंख्येमुळे पुण्यातील कोंढवा या क्षेत्राची ‘छोटा पाकिस्तान’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या कोंढव्यातील ‘ब्लू बेल्स’ शाळेमध्ये युवकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रम दुर्घटना: उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

इतकी वर्षे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात का आले नाही ? अशा शाळांना परवानगी कशी दिली जाते? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी आणल्यानंतरही या कारवाया चालू असतील, तर हे खूप गंभीर आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुणे येथून केला होता. स्वातंत्र्योत्तर काळानंतर पुणे शहर हे हिंदवी स्वराज्याचा गड होणे अपेक्षित होते; मात्र या ठिकाणी दहशतवादी कारवाया करणारे प्रशिक्षण केंद्र बनत चालले आहे, हे चिंताजनक आहे, असे हिंदू जनजागृती समिती’चे नागेश जोशी‌ यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.