मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे वसाहतीतील १७७ झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली

मुंबई दि.२४ :- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे वसाहतीतील १७७ झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सोमवारी झाडे कापण्याची कार्यवाही केली. पहाटे पाच वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरेतील झाडे कापण्यात आली. आरेतील झाडे कापण्यास पर्यावरणप्रेमी आणि आरेवासीयांचा विरोध आहे. मात्र एमएमआरसी न्यायालयाकडून परवानगी घेऊन झाडे कापण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना दिसत आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर रात्रीच्या वेळेस २०१९ मध्ये एमएमआरसीने झाडे कापण्याची कार्यवाही केली होती.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रम दुर्घटना: उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

सारीपुत नगरवरून मेट्रो गाड्या पुढे आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी आरेतील ८४ झाडे कापण्याची गरज असल्याचे सांगून एमएमआरसीने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने ही परवानगी दिली. मात्र एमएमआरसीने ८४ ऐवजी १७७ झाडे कापण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर केला.

कविता आणि काव्यविषयक साहित्याला वाहिलेल्या द.भा.धामणस्कर वाचनालयाचे डोंबिवलीत उदघाटन

याला आक्षेप घेऊन आरे वाचवा आंदोलनकर्त्यांनी आणि आरेतील बाधित कुटूंबाने (ज्यांची ७५ झाडे कापली जाणार आहेत त्या भोये कुटूंबाने) याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ८४ झाडे कापण्याची परवानगी असताना १७७ झाडे कापण्याच्या एमएमआरसीच्या प्रस्तावावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करून एमएमआरसीला १० लाखांचा दंड ठोठावला. मात्र त्याचवेळी १७७ झाडे कापण्यास परवानगीही दिली. या परवानगीनुसार आज पहाटे झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान याचिकाकर्त्यांनी १७७ पेक्षा अधिक झाडे एमएमआरसीने कापल्याचा आरोप करून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.