महाराष्ट्र भूषण कार्यक्रम दुर्घटना: उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मुंबई दि.२३ :- महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात घडलेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज केली. शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन राज्याचे प्रमुख या नात्याने या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली.

कविता आणि काव्यविषयक साहित्याला वाहिलेल्या द.भा.धामणस्कर वाचनालयाचे डोंबिवलीत उदघाटन

खारघर येथील घटना ही मानव निर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सदर प्रकरणी आपण उच्च स्तरिय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यास शासनास निर्देश द्यावेत, या मागणीचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले.

एस.टी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटींची रक्कम प्रलंबित

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर १४ कोटी रुपये खर्च करण्यात आला, मात्र कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. सदर घटनेला जबाबदार असलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा दाखविणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलिसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत आणि अन्य पदाधिकारी यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published.