पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई दि.०५ :- नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बसचा कांजूरमार्ग येथे अपघात झाल्यामुळे मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. जेव्हीआरएल सिग्नलजवळ बस एका चारचाकी वाहनाला धडकल्यामुळे हा अपघात घडला. अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार मंत्रालयात नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही करण्याची सूचना
अपघातग्रस्त दोन्ही वाहनांमुळे जेव्हीआरएल सिग्नल ते मुलुंड दरम्यान वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान अपघातग्रस्त बस आणि चारचाकी वाहन रस्त्यावरुन बाजूला करण्यात आले आहे.