मुंबईत सध्या ६ हजार २७९ युनिट रक्तसाठा शिल्लक, उन्हाळी सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई दि.२१ :- मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दररोज किमान ९०० ते १ हजार २०० युनिट रक्ताची आवश्यकता असते. मुंबईत सध्या ६ हजार २७९ युनिट इतका रक्तसाठा उपलब्ध असून मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० रुग्णशय्यांचे बहुविध सुविधा रुग्णालय – उद्या भूमिपूजन सोहळा

राज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार युनिट रक्त उपलब्ध असून, उन्हाळय़ाच्या सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे. उन्हाळयाच्या सुट्टीत (एप्रिल – मे महिन्यात) नागरिक मोठय़ा प्रमाणात गावाला किंवा बाहेरगावी जातात.

ट्रक बंद पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी ऐरोलीपर्यंत वाहनांच्या रांगा

त्यामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होते. परिणामी, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने रक्ताची मोठय़ा प्रमाणात गरज भासण्याची शक्यता आहे. दरम्यान २३ एप्रिल रोजी अनिरुद्ध बापू यांच्या संप्रदायामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून १० हजार रक्त बाटल्या गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.