ट्रक बंद पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी ऐरोलीपर्यंत वाहनांच्या रांगा
मुंबई दि.२१ :- मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनीजवळ शुक्रवारी सकाळी ट्रक बंद पडल्याने महामार्गावर दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली. नितीन कंपनीपासून ऐरोलीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मुंब्रा बाह्यवळण महामार्ग बंद असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.
अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिका-याला मारहाण
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग जातो. या मार्गावर वाहनांची दिवस रात्र वर्दळ असते. सकाळ आणि सायंकाळी नोकरदार वर्गाची वाहने या रस्त्यावर वाहतूक करतात. या मार्गावरून रात्री ११ ते ६ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत अवजड वाहतुक सुरू असते.
देवनार पशुवधगृह येथे ३०० सीसीटीव्ही बसविणार
वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू केले. एक ते दीड तासाने ट्रक बाजूला करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या ते एक तासाने महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. या कोंडीचा फटका ठाणे आणि नवी मुंबई शहरातील नोकरदार आणि वाहनचालकांना बसला.